• Sun. Apr 19th, 2026

*बजरंग सोनवणे यांनी केले मांजराचे जलपूजन*

Bybaba maske

Oct 16, 2022

*बजरंग सोनवणे यांनी केले मांजराचे जलपूजन*

 

गौतम बचुटे/केज :- बीड, उस्मानाबाद आणि लातूर या तीन जिल्ह्याचा शेतकऱ्यांच्या जीवनात हरीत क्रांती घडवून आणणार मांजरा प्रकल्प काठोकाठ भरला आहे. त्याची जलपूजन राष्ट्रवादीचे नेते बजरंग सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.

 याबाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील मांजरा नदीवरील मांजरा धरण हे काठोकाठ भरले असून सकाळी त्याचे दोन दरवाजे उघडले आहेत. सलग तीन वर्षे हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने बीड, लातूर, उस्मानाबाद या भागातील ओलिताखाली जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचा व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. त्या निमित्त येडेश्वरीचे संस्थापक चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बजरंग सोनवणे यांनी दि. १६ ऑक्टोबर रोजी दुपारी मांजरा प्रकल्पावर जाऊन जलपूजन केले. यावेळी त्यांचे सोबत बालासाहेब दादा बोराडे, बाळकृष्ण भवर, गुंडाप्पा भुसारी, पिंटु ठोंबरे, भाऊसाहेब गुंड, बालासाहेब गाढवे, इनामदार, मुस्तफा खुरेशी, युनुस शेख, गोपाळ मस्के, जयचंद धायगुडे, मुकूंद कणसे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!