• Sat. Apr 25th, 2026

केज मधुन तिर्रट खेळणारे तीन जुगारी पकडले

Bybaba maske

Nov 21, 2022

केज मधुन तिर्रट खेळणारे तीन जुगारी पकडले

रोखठोक वार्ताहर 

केज मधील आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या मोकळ्या पटांगणात गाड्या लावण्याच्या पार्कींग मध्ये जुगार खेळणाऱ्या तीन जुगाऱ्यांना पोलिसांनी पकडून त्यांच्यावर कारवाई केली.

केज शहरामध्ये आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या दक्षिणेस कानडी रोडच्या मुख्य रस्त्याच्या उत्तर बाजुस मोठ्या गाड्याच्या पार्किंगमध्ये मोकळ्या जागेत उघड्यावर जुगार सुरू असल्याची माहिती केज पोलिसांना मिळताच सोमवार दि.१९ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजन्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशावरून केज पोलिसांनी अचानक धाड टाकली. त्यावेळी युवराज कारभारी मुंडे वय.48 वर्ष रा. पिसेगाव , सुहास चिंतामन लांडगे वय 42 वर्ष रा. केज , अशोक अंकुश बारगजे वय 34 वर्ष रा. टाकळी हे तीघे तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्या कडून जुगाराचे साहित्य आणि नगदी रोख 5 हजार 50 रु. असा मुद्देमाल ताब्यात घेतला.

पोलीस नाईक दिलीप चंद्रभान गित्ते यांच्या फिर्यादी वरून युवराज कारभारी मुंडे, सुहास चिंतामन लांडगे ,अशोक अंकुश बारगजे या तिघां विरुद्ध गु. र. नं. ५२५/२०२२ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधकअधिनियम १२(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक चौधरी हे पुढील तपास करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!