बनावट दारू तयार करण्यासाठी
आणलेल्या स्पिरीटचा साठा व इतर साहित्य असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने – तालुक्यातील चिंचोळी माळी परिसरात ही कारवाई केली असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली.
तालुक्यातील चिंचोली माळी परिसरात बनावट दारू तयार करण्यासाठी स्पिरीट व इतर साहित्य च आणल्याची गुप्त माहिती उत्पादन च शुल्क विभागाला मिळाल्यानंतर बीड क येथील अधीक्षक विश्वजित देशमुख री यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी ल. निरीक्षक अभय औटे व इतर ते. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकाने वी. चिंचोली माळी परिसरात धाड टाकली. नसे याठिकाणी आनंद श्रीकृष्ण उकंडे याने कुर स्पिरीटचा साठा करून ठेवला होता. पथकाने स्पिरीट, दुचाकी, आरोपींचे
मोबाइल जप्त केले. या कारवाईत एकूण २ लाख ३१३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आनंद श्रीकृष्ण उकंडे (रा. पूनम गल्ली, बीड) व आकाश श्याम जाधव (रा. सुभाष कॉलनी, रा. बीड) यांना अटक करण्यात आली. प्रभारी निरीक्षक अभय औटे, निरीक्षक रमेश राठोड, विजय आगळे, आर. एन. गोणारे, बी. के. पाटील, एस. व्ही. धस, एस. एस. सांगोळे, एन. बी. मोरे, सुशील ढोले आदींनी ही कारवाई केली.
१४ दिवसांची कोठडी
३१ ऑक्टोबर रोजी दुपारी कारवाई केल्यानंतर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अवैधरीत्या मद्य तयार करणारे तसेच विक्री करणाऱ्यांवर उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर आहे.