• Sun. Apr 19th, 2026

माझ्याकडे आरक्षणाचा फॉर्म्युला, पण आताच्या चोरांपुढे मांडणार नाही!

Bybaba maske

Dec 19, 2023

माझ्याकडे आरक्षणाचा फॉर्म्युला, पण आताच्या चोरांपुढे मांडणार नाही!

रोखठोक न्युज 

मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्याचा फॉर्म्युला माझ्याकडे आहे, पण आताच्या या चोरांपुढे तो मांडला तर ते त्याचे खोबरे करतील. त्यामुळे तो मांडणार नाही, असे विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज केले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मनोज जरांगे यांच्या मागणीवर माझ्याकडे उपाय आहे; पण आताच्या या चोरांपुढे तो मांडला तर ते त्याचे खोबरे करतील. त्यामुळे मी त्यांच्यापुढे हा उपाय मांडणार नाही. नवे सत्ताधारी येऊ द्या. त्यानंतर मी त्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता कसा हाताळायचा हे सांगेन.

प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही निशाणा साधला. अॅडव्होकेट जनरल कुंभकोणी यांनी मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणाचा प्रश्न यशस्वीपणे हाताळला, पण त्यानंतरही तत्कालीन सरकारने कुंभकोणी यांना पुढे काम करू दिले नाही. त्यांना या खटल्यात लक्ष घालू नका, हजर राहू नका असे आदेश देण्यात आले. असे का? गिरीश महाजन यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यावे, असे ते म्हणाले.

baba maske

Related Post

मागासवर्गीय होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप; आर.आर. पाटील एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम मांजर्डे येथे ४९ विद्यार्थ्यांना रोख धनादेश वितरण; आमदार रोहित पाटील यांची प्रमुख उपस्थिती
खमके नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी ४ कोटी ७८ लाखांचा निधी खेचून आणला दलितेत्तर वस्ती सुधार योजनेअंतर्गत विकासकामांना प्रशासकीय मान्यता; पहिल्या टप्प्यात ७५ लाखांची कामे मंजूर
“दाखवा चौकशीचं पत्र आणि घ्या १ लाख!” – केजमध्ये २.७७ कोटींच्या कामांवर थेट सत्ताधाऱ्यांना आव्हान  नगरसेवक कपिल मस्के यांचा नगराध्यक्षा सिता बनसोड यांना खुला चॅलेंज; समाजमंदिर व रस्ते निधीवर प्रश्नचिन्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!