• Fri. Apr 24th, 2026

आजोळातून अल्पवयीन मुलीचे अपहरण 

Bybaba maske

Dec 31, 2023

आजोळातून अल्पवयीन मुलीचे अपहरण 

रोखठोक न्युज वार्ताहर 

आजीला भेटण्यासाठी आईसोबत आलेल्या एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना केज तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तिविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

        लातूर जिल्ह्यातील एका गावातील इयत्ता १० वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलगी ही आपल्या आईसोबत केज तालुक्यातील एका गावात आजोळी आपल्या आजीला भेटण्यासाठी आली होती. ९ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास ही अल्पवयीन मुलगी बाथरूमला जात असल्याचे सांगून घरामागे शेतात गेली. तिच्या मामाला ती गावात भेटली असता मॅगी आणण्यासाठी आल्याचे सांगितले. त्यानंतर काही वेळात गायब झाली. तिच्या मामांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र तिचा शोध न लागल्याने लातुर, पुणे, अंबाजोगाई व इतर ठिकाणी असलेल्या नातेवाईकांकडे फोनद्वारे व प्रत्यक्ष जावून २८ डिसेंबरपर्यंत शोध घेतला. परंतु तिचा शपथ लागत नसल्याने तिचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार तिच्या आईने केज पोलिसात दिल्यावरून अज्ञात व्यक्तिविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. फौजदार राजेश पाटील हे तपास करीत आहेत. 

    दरम्यान, सदरील मुलीचा रंग गोरा, उंची पाच फूट असून अंगात गुलाबी रंगाचे जर्किंग, काळ्या कलरची जिन्स, पायात बूट आहे. अशा वर्णनाची मुलगी दिसून आल्यास केज पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. असे आवाहन ही फौजदार राजेश पाटील यांनी केले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!