• Wed. Oct 28th, 2026

बहुमत असताना अजित पवारांना सोबत का घेतले? RSS चा भाजपाला सवाल; काढली खरडपट्टी

Bybaba maske

Jun 12, 2024

बहुमत असताना अजित पवारांना सोबत का घेतले? RSS चा भाजपाला सवाल; काढली खरडपट्टी

रोखठोक न्युज वार्ताहर 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म ज्या महाराष्ट्राच्या भूमित झाला तिथेच भाजपाची निराशाजनक कामगिरी झाल्याच्या पार्श्वभूमीवर यामागील कारणांवरुन संघाने भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची मातृक संस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मस्थानी म्हणजेच महाराष्ट्रात आलेल्या अपयशावर संघाने भाष्य केलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या निराशाजनक कामगिरीचं विश्लेषण करताना थेट अजित पवारांचा उल्लेख करत भाजपाच्या राज्यातील नेत्यांच्या धोरणांवर संघाने निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात अजित पवारांशी केलेली हातमिळवणी व काँग्रेसच्या नेत्यांना पक्षात घेतल्यामुळे भाजपच्या ‘ब्रँड’ला धक्का बसल्याचा टोला संघाचं मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’मधून लगावण्यात आला आहे. 

अजित पवारांना सोबत का घेतले?

‘ऑर्गनायझर’ मासिकाच्या अंकात संघाचे आजीव स्वयंसेवक असलेल्या रतन शारदा यांनी लिहिलेल्या लेखामध्ये लोकसभेच्या निकालांचं विश्लेषण करण्यात आलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कामागिरीवर विशेष नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रात भाजप व शिंदेंची शिवसेना यांच्याकडे पुरेसे बहुमत असताना अजित पवारांना सोबत का घेतले, हा प्रश्नच आहे, असं या लेखात म्हटलं आहे. साधारण अडीच वर्षापूर्वी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमधून बाहेर पडलेल्या आमदारांच्या मदतीने भाजपाने राज्यात सरकार स्थापन केलं होतं. त्यानंतर 2023 मध्ये मे महिन्यात अजित पवार यांच्यासहीत आमदारांचा मोठा गट मूळ राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडला आणि शिंदे सरकारबरोबर सत्तेत सहभागी झाला. मात्र अजित पवार गटाला का सत्तेत घेतलं हे नकळण्यासारखं असल्याचं संघाने म्हटलं आहे.

शरद पवारांच्या पक्षाला उतरती कळा लागली असती

“अनावश्यक राजकारण तसेच हेराफेरीचं उत्तम उदाहरण म्हणून महाराष्ट्राकडे पाहता येईल. महाराष्ट्रात जे घडलं ते टाळता आलं असतं. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा गट भाजपमध्ये सामील झाला. खरं तर भाजपा आणि शिवसेना (शिंदे गटाला) सहज बहुमत मिळालं असतं. पुढील 2 ते 3 वर्षांमध्ये शरद पवारांच्या पक्षाला राष्ट्रवादी पक्षाला अंतर्गत कलहामुळे उतरती कळा लागली असती,” असं ‘ऑर्गनायझर’मध्ये म्हटलं आहे.

baba maske

Related Post

प्रेमसंबंधाच्या संशयातून प्राध्यापकाचे अपहरण; बर्दापूरच्या खडी केंद्रावर बेदम मारहाणीत खून!लातूरहून अपहरण करून अंबाजोगाई तालुक्यात आणले; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल, रुग्णालयातील बनाव पोलिसांनी उधळला
केज तहसीलदारांच्या कारवाईवरून राजकीय रणकंदन! आमदार नमिता मुंदडा कारवाईच्या मागणीवर ठाम; खासदार बजरंग सोनवणे तहसीलदारांच्या समर्थनात — संघटनांचाही आंदोलनाचा इशारा
कलाकेंद्रातील वादाचा रक्तरंजित शेवट; गर्भवती नर्तिकेची हत्या करून 275 किमी दूर जंगलात जाळले!बेशुद्ध नर्तिकेला मृत समजून आरोपींचा संतापजनक कृत्य; 11 तासांचे CCTV फुटेज, मोबाईल लोकेशनच्या आधारे तीन दिवसांत हत्याकांडाचा पर्दाफाश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!