नऊ महिने छळ, चार वेळा पीएसआयकडून अत्याचार
बीडच्या असहाय्य डॉक्टर लेकीची फलटणमध्ये आत्महत्या
सातारा/ववडवणी न्यूज न्यूज
निरढावलेल्या प्रशासन व्यवस्थेविरोधात बीड जिल्ह्यासह अखंड महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. त्याचे कारणही तसेच. बीड जिल्ह्यातल्या कोठरबन येथील मूळ रहिवासी आणि ह.मु. कवडगाव येथील एबीबीएस डॉक्टर असलेल्या लेकीने सातारा जिल्ह्यातील फलटण येथे रात्री उशिरा आत्महत्या केली. येथील पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने चार वेळा बलात्कार केला. त्याचबरोबर प्रशांत बनकर नावाच्या व्यक्तीने चार महिने शारीरिक आणि मानसिक त्रास दिला, असा आशय आत्महत्या केलेल्या या मुलीने आपल्या हतावर लिहिला. या घटनेने राज्यभरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणविसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित दोषी बदनेला तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिल्यानंतर येथील पोलीस अधिक्षक तुषार दोषी यांनी बदने यास निलंबीत केले आहे. आज सायंकाळी उशिरा कवडगाव येथे संबंधित मुलीच्या पार्थीवदेहावर अंत्यसंस्कार
याबाबत अधिक माहिती अशी की, बडवणी तालुक्यातील कोठरबन येथील एका शेतकरी कुटुबांत जन्मलेली ही मुलगी एमबीबीएस डॉक्टर झाली, सध्या तिचे आई-वडिल हे कबडगाच येथे राहत आहेत. सदरील एमबीचीएस झालेली मुलगी गेल्या वर्ष दीड वर्षापासून साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये एक बरिष्ठ महिला डॉक्टर महणून काम करत आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक गोपाल बदने हा या महिला डॉक्टरला सातत्याने त्रास द्यायचा. याबाबतची तक्रार सदरील
महिला डॉक्टरने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली होती. लिखित स्वरुपात केलेल्या तक्रारीत तिने म्हटले होते, माझ्याचर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन, या गंभीर इशाच्याकडे तिच्या वरिष्ठांनीही दुर्लक्ष केले. तिच्या तक्रारीकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे रात्री उशिरा फलटणमधील एका हॉटेलमध्ये संबंधित महिला डॉक्टरने आपले आयुष्य संपविले. आत्महत्येपूर्वी तिने आपल्या हातावर ‘माझ्या मरणाचे कारण पीएसआय गोपाल आहे, त्याने माझा चार वेळा बलात्कार केला आणि प्रशांत बनकर याने चार महिने, शारीरिक व मानसिक त्रास दिला. या घटनेने राज्यात उडवून दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी बाची गंभीर दखल घेत तेथील पोलीस अधिक्षक तुषार दोषी यांच्याशी संपर्क साधून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. तुषार दोषी यांनी तात्काळ पीएसआय गोपाल बदने वाला निलंबीत केले आहे. व्यवस्थेने तक्रारीकडे गांभीयनि लक्ष दिले असते तर ती आज जीवंत असती. या प्रकरणातील सर्वच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे. तिच्या पार्थीवदेहावर बीड जिल्ह्यातील कवडगाव (बु.) येथे आज चार वाजल्यानंतर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
डॉ. संपदावर वेळ आणणाऱ्यांना सोडू नका
वडवणी तालुक्यातील कोठरबन येथील श्रीकृष्ण श्रीपती मुंडे (ह.मु. कबडगाव बु.) या शेतकऱ्याच्या पोटी जन्मलेली संपदा मोठ्या कशातून डॉक्टर झाली. एमबीबीएसचे शिक्षण तिने पूर्ण केले. दोन वैपासून ती बदेयकीय अधिकारी म्हणून साताऱ्यातल्या फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये आपलं कर्तव्य बजावत होती. या वेळी तेथील पीआयने तिला त्रास दिला. तिच्यावर अत्याचार केला. याची तक्रार तेथील रुग्णालयवाया वरिष्ठाना संपदाने केली मात्र त्या तक्रारीची दखल वैद्यकीय क्षेत्रातील वरिष्ठांनी घेतली नाही. त्यामुळे हा जो कोण नराधम आहे त्याच्यासह या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना सोडू नका, अशी संतप्त भावना जिल्हावासियांची झाली आहे
