• Sat. Apr 18th, 2026

केज बसस्थानकातून महिलेंचे मंगळसूत्र लंपास करणाऱ्या महिला आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

Bybaba maske

Apr 3, 2026

केज बसस्थानकातून महिलेंचे मंगळसूत्र लंपास करणाऱ्या महिला आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

रोखठोक न्यूज वार्ताहर 

केज शहरातील बसस्थानक परिसरात प्रवाशांना लक्ष्य करून महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या एका महिला आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंजूश्री हरीराम जगदाळे (रा. फुलेनगर, केज) या 19 मार्च 2026 रोजी बसस्थानकावर बसची वाट पाहत असताना अज्ञात महिलेने त्यांच्या गळ्यातील सुमारे 9.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले होते. या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित महिलेचा शोध घेतला. अखेर 2 एप्रिल 2026 रोजी पोलिसांनी सापळा रचून आरोपी महिलेला अटक केली.

चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून तिच्याकडून सुमारे 9.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, किंमत अंदाजे 1 लाख 42 हजार रुपये, जप्त करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत (बीड), अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके, पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बंटेवाड (स्था. गु. शा. बीड) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, महेश जोगदंड,  जफर पठाण,  दिलीप गित्ते,  स्वाती मुंढे,  गणेश मराडे यांनी पार पाडली.

पुढील तपास सुरू असून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!