• Sun. Sep 13th, 2026

लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने पेटवून घेत, प्रेयसीला मिठी मारली

Bybaba maske

Nov 23, 2022

लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने पेटवून घेत, प्रेयसीला मिठी मारली

रोखठोक वार्ताहर 

लग्नास नकार दिल्याने संतापलेल्या प्रियकराने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून प्रेयसीला मिठी मारली. या घटनेत दोघेही गंभीर भाजले होते. घाटी रुग्णालयात दोघांवर उपचार सुरू असताना 95 टक्के भाजलेल्या तरुणाचा रात्री 10 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला तर तरुणीवर उपचार सुरू आहेत. विद्यापीठ परिसरातील शासकीय न्याय सहायक विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत हा भयंकर थरार घडला. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्याच्या दाभा गावातील गजानन खुशालराव मुंढे (30) हा विद्यापीठ परिसरातील वसतिगृहात राहत होता. तो विद्यापीठात प्राणिशास्त्रामध्ये पीएच.डी.चे संशोधन करत तासिका तत्त्वावर काम करत होता. सिल्लोड तालुक्यातील पूजा कडुबा साळवे (28, सिडको एन-7) ही शासकीय विज्ञान संस्थेत बायोफिजिक्समध्ये पीएच.डी. करते आणि तीदेखील तासिका तत्त्वावर काम करते. दोघांचेही पीएच.डी.चे गाईड डॉ. चोंडीकर असल्याने संशोधनादरम्यान दोघांची मैत्री झाली. त्याचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र, अलीकडे पूजा गजाननच्या प्रेमाला प्रतिसाद देत नव्हती. त्यावरून गजानन हा कायम तणावात असायचा.

baba maske

Related Post

धाराशिव ब्रेकिंग : मराठा आंदोलकांनी जाळली उमरगा तहसीलदारांची खुर्ची!मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप; आंदोलन पोलिसांच्या ताब्यात, घटनेने एकच खळबळ
केज पोलिसांची मोठी कारवाई! १४.८८ लाखांचा ७४.४३२ किलो गांजा जप्त; आरोपी जेरबंदकेवड गायरान परिसरात छापा; सुनील शिवाजी पवार याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा
खरा मालक अंधारात ठेवून बनावट मालक व बोगस कागदात्राद्वारे प्लॉटचे खरेदी खत केले ; तिघा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!